न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२१) :- एमआयडीसीच्या रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम गुरुवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
त्यानुसार पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी, दिघी, व्हीएसएनएल, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागात गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
शुक्रवारी (दि. २८) पाण्याचा पुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करावा. पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीने केले आहे.

















