- जम्बो रुग्णालयात आणखी २०० ऑक्सिजनयुक्त बेडची भर..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२१) :- नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील जम्बो रुग्णालयात आणखी २०० ऑक्सिजनयुक्त बेड वाढविले आहेत. त्यामुळे एकूण बेडची संख्या ८०० झाली. त्यामध्ये ६०० बेड ऑक्सिजनयुक्त, ११० आयसीयू आणि २० एचडीयू बेड उपलब्ध आहेत. त्यावर दोन महिने कालावधीसाठी १ कोटी ७१ लाख रुपये खर्च होणार आहे.
जुलै २०२० मध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढला असता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट प्रसिद्ध केला त्यामध्ये मेडब्रोज हेल्थकेअर डायग्नोस्टिक सेंटर यांना कामाचे २४ ऑगस्ट २०२० रोजी दिले. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने हे जम्बो रुग्णालय १६ जानेवारीपासून बंद केले होते.
महापालिका हद्दीमध्ये फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने जम्बो रुग्णालय ४०० बेडसाठी सुरू केले.
पहिल्या टप्प्यात १०० बेड ऑक्सिजनयुक्त, ५० बेड आयसीयू आणि ५० बेड एचडीयू असे २०० बेडचे जम्बो कोरोना रुग्णालय दोन महिने कालावधीसाठी सुरू केले. दुसऱ्या टप्प्यात १०० बेड ऑक्सिजन युक्त, १० आयसीयू आणि ९० बेड एचडीयू असे २०० बेडचे सुरू केले.


















