- बिजलीनगरच्या रुग्णालयात करीत होता डॉक्टरकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२१) :- बिजलीनगर येथील एका रुग्णालयात वर्षभर काम केलेल्या एका बोगस डॉक्टरवर पिंपरी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो केवळ दहावीपर्यंत शिकला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच त्याने इंग्रजी शिकून घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
अक्षय केशव नेहरकर (रा. बिजलीनगर चिंचवड), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल भास्कर काटकर (वय ४९, रा. वरळी, कोळीवाड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
नेहरकर याने कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना पदवी असल्याचे भासवले. वैद्यकीय कन्सल्टंट म्हणून नोकरी मिळवण्यासाठी आयसीआयसीआय जनरल इन्शुरन्स कंपनीस ई-मेलद्वारे रिझ्यूम पाठवला होता.


















