- वाल्हेकरवाडीतील घटना; चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२१) :- ‘आमची पोलिसात तक्रार करतो काय’ असे म्हणत एका टोळक्याने चार जणांना लोखंडी सळई व लाकडी दांडक्याने मारहाण केली. गुरुद्वारा चौक, वाल्हेकरवाडी येथे सोमवारी (दि. २४) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
रंजीत अमरनाथ सिंह (वय ४६, रा. गुरुद्वारा चौक, वाल्हेकरवाडी) यांनी मंगळवारी (दि २५) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साकेत शेख, सोहेल शेख आणि त्यांच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी रंजीत हे घरी जात असताना आरोपी साहिल शेख, साकेत शेख व त्यांचे चार मित्र फिर्यादीच्या घराच्या पटांगणामध्ये आले. आमची पोलिसात तक्रार करतो काय, असे म्हणून साकेत याने लोखंडी सळईने त्रिलोकी सिंह यांना डोक्यात मारून जखमी केले. तसेच सोहेल शेख व त्यांचे चार मित्र यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादी तसेच मंतोष सिंह, राजसिंह यांना मारहाण करून शिवीगाळ केली. पोलिसांत तक्रार दिल्यास तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकीही आरोपींनी दिली.