न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२१) :- चिंचवडच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेतील झाकिया झाकिर हुसेन मेमन हीने जर्मन विषयाच्या शिक्षिका प्रा. अर्चना भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मन ऑलिम्पियाड (लेव्हल- १) या परीक्षेमध्ये जर्मन विषयात ५० पैकी ५० गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.
सध्याच्या कोविड-१९ महामारीच्या वातावरणात ऑनलाईन शिक्षण सुरू असतानासुद्धा अनेक विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे, परीक्षेकडे दुर्लक्ष होत आहे, असे दिसून येते. पण एकीकडे रोजचा अभ्यास सुरू ठेवून झाकियासारखी विद्यार्थिनी जर्मन विषयात आपल्या अभ्यासातून ऑलिम्पियाड परीक्षेत प्रथम आल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एक प्रकारची प्रेरणाच मिळाली आहे.
झाकियाच्या या यशाचे ऑनलाईन घेण्यात आलेल्या शिक्षक-पालक सभेत संस्थेचे सचिव डॉ. दिपक शहा, प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे व सर्व शिक्षकांकडून संपर्क साधून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.