न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२१) :- पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने शिवसेनेचे उपनेते रविंद्र मिर्लेकर आणि पदाधिकारी प्रत्यक्ष मदत पोहचवित आहेत. त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस पाच व्हेंन्टीलेटर देण्यात आले आहेत. आयुक्त राजेश पाटील व अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी हे व्हेंन्टीलेटर स्विकारले, अशी माहिती शिवसेना संपर्क प्रमुख बाळाभाई कदम यांनी दिली.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेले पाच व्हेंन्टीलेटर गुरुवारी (दि. २७ मे) शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड मनपास देण्यात आले.
यावेळी बाळाभाई कदम, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, गटनेते राहुल कलाटे, शिवसेना शहर संघटीका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक घनंजय आल्हाट, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष दस्तगीर मणीयार, कामगार नेते इरफान सैय्यद, निलेश हाके, श्रीनिवास आदमाने, नितीन गायकवाड, शुभम तेली, राहुल शर्मा, गणेश शितोळे आदी उपस्थित होते.
















