- पालिकेच्या क्रीडा सभापतींच्या केबिनमधील प्रकार..
- ठेकेदारावर कारवाईची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील क्रीडा सभापतींच्या केबिनमधील मिटिंग रूममध्ये सफाई कार्माचा-याकडून निष्काळजीपणे पाण्याच्या बाटली मध्ये अॅसिड ठेवले होते.
नगरसेवक राजू बनसोडे यांच्या मित्राने त्या बाटलीतील अॅसिड पाणी समजून पिल्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. निष्काळजीपणाने काम करणा-या सफाई कंत्राटदार व त्यांच्या कर्मचाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी.
या सर्व घटनेस क्रीडा सभापती प्रत्यक्षदर्शी आहेत. सफाई कंत्राटदार तावरे फेसीलीटी या संस्थेस काळ्या यादीत टाकून त्यांचे महापालिका सफाई कंत्राट काढण्यात यावे, तसेच त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरसेवक राजू बनसोडे व क्रिडा सभापती उत्तम केंदळे यांनी केली आहे.
















