न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर पुर्वी ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसापर्यत पूर्ण झालेले आहे, अशांना देण्यात येणार आहे.
या अनुषंगाने उद्या (दि. २८) रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’ पहिला व दुसरा डोस पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ६५ लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.
















