- गुन्हा दखल; पोलिसांकडून तरुणाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२१) :- अल्पवयीन मुलगी असल्याचे माहिती असूनही तिला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले. मुलगी ही पाच महिन्याची गरोदर आहे. बावधन आणि पिंपळे निलख येथे फेब्रुवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत ही घटना घडली.
याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने बुधवारी (दि. २६) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चेतन विवेक ओव्हाळ (वय २४, रा. पिंपळे निलख), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.