- ऑटो क्लस्टर व नेहरूनगर रुग्णालयात ‘रिचार्ज टू डिस्चार्ज’ थेरपी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. मे. २०२१) :- कोरोनामुळे नाती दुरावली असताना रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल झाल्यानंतर ते अक्षरश: एकटे पडतात त्यामुळे घाबरून जातात. रुग्ण घाबरून गेल्याने वैद्यकीय उपचार केले तरी ते उपचाराला योग्य असा प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे नाशिकचा शिवप्रसाद महाळे हा तरुण रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रिचार्ज टू डिस्चार्ज ही थेरपी लोकप्रिय होत आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्लस्टर व नेहरूनगर येथील रुग्णांशी जम्बो रुग्णालयात रिचार्ज टू डिस्चार्ज गेल्या पंधरा दिवसांपासून हा दैनंदिन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सकाळी १० ते १२ ऑटो क्लस्टर व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत जम्बो रुग्णालयात समुपदेशन सुरू आहे. यामध्ये रुग्णांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांना जाणवणारा एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न महाले करीत आहेत.
‘ रिचार्ज टू डिस्चार्ज ‘ या उपक्रमाद्वारे महाले यांनी रुग्णालयातील दाखल झालेल्या रुग्णांशी प्रत्यक्ष आयसीयू व ऑक्सिजन बेडच्या जवळ जाऊन रुग्णांबरोबर थेट संवाद साधत आहेत.
















