- चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. मे. २०२१) :- हॉटेल भाड्याने देण्याच्या नावाखाली एका तरुणाची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली. संकेत बाळासाहेब थोरवे (२९, रा. सहयोगनगर, रुपीनगर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव असून त्यानी बुधवारी (दि. २६) चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार राजे शिवाजीनगर, चिखली येथील एका ३९ वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ एप्रिल २०१९ ते २६ मे २०२१ या कालावधीत वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने हॉटेल भाड्याने देते, असे सांगून फिर्यादी थोरवे यांच्याकडून अनामत रक्कम व आगाऊ भाड्याच्या नावाखाली ऑनलाइन साडेसहा लाख रुपये घेऊन फसवणूक केली.
















