न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसें.) :- राज्यव्यापी गुणवंत कामगार कल्याण विकास परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांची निवड करण्यात आली आहे. तर, अध्यक्षपदी भारती चव्हाण आणि कार्याध्यक्षपदी कामगार नेते यशवंत भोसले यांची निवड करण्यात आली आहे. जानेवारी २०१९ मध्ये दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती यशवंत भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.
यात शिवाजीराव शिर्के, सुरेश कंक, राज अहिरराव, मोहन गायकवाड, तानाजी एकोंडे, रामकृष्ण राणे, राजेश हजारे, आकाश घोरपडे, स्वानंद राजपाठक, सोमनाथ पतंगे, पंकज पाटील, भरत शिंदे, विजयसिंह राजपूत, आशफिया सय्यद, श्रीकांत जोगदंड, कल्पना भोईंगडे, सुभाष चव्हाण, सुरेश केसरकर, सुहास वडीकर, ज्ञानेश्वर कातोरे व आदी गुणवंत कामगारांची नियोजन समितीवर निवड करण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यात गुणवंत कामगार विकास परिषदेचे दोन दिवसीय अधिवेषन घेण्याचे नियोजित आहे. अधिवेशनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगारमंत्री संभाजी निलंगेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे यांना निमंत्रण दिले जाणार आहे.










