- भोजन दरात तब्बल पन्नास रुपयांची घसघशीत वाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. मे. २०२१) :- महापालिकेची रुग्णालये, कोविड सेंटर येथील कोरोनाबाधित रुग्णांना मोफत नाष्टा आणि भोजन पुरविले जाते. एका रुग्णास एका वेळेच्या नाष्टा आणि दोन वेळेचा भोजनाचा दर १८० रुपये होता. लॉकडाऊनचे कारण पुढे केल्याने ५० रुपयांनी वाढवून २३० रुपये केला. महापालिकेने वाढीव दराने बिले दिले आहेत.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने नेहरुनगरचे जम्बो रुग्णालय, चिंचवडचे ऑटो क्लस्टर रुग्णालय, चिखली येथील घरकुल कोविड सेंटर, भोसरीचे बालनगरी आणि चाकणमधील म्हाळुगे म्हाडा वसाहतीमध्ये कोविड केअर सेंटर सुरु आहे. येथील रुग्णांना सकाळचा नाष्टा, दुपारी आणि रात्रीचे भोजन दिले जाते, प्रतिरुण हा खर्च १८० रुपये होता, त्यानुसार महापालिका संबंधित हॉटेल आणि केटरसला बिल दिले जात.
चिखली घरकुलातील बी -१० आणि बी -१२ मधील २ इमारतीमधील बाधिताना ३० मार्च ते २८ एप्रिल या कालावधीत नाष्टा आणि भोजनाचा पुरवठा केला. रुपये २८० या दराने लाख ४९ हजार ४८० रुपये आणि २३० रुपये दराने ७ लाख ९ हजार ५५० रुपये असे २८ लाख ५९ हजार ३० रुपयांची बिले पालिकेने दिली आहेत.


















