- पतसंस्थेच्या सभासदांना १४ टक्के लाभांश जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. मे. २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिका सेवक सहकारी पतसंस्थेची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि.२७) ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या वेळी पतसंस्थेच्या सर्व सभासदांना १४ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
पिंपरी स्टेशन येथील कार्यालयात झिंजुड़े यांच्या मार्गदर्शनाखाली व पतसंस्थेच्या चेअरमन सीमा सुकाळे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाविषयक नियमांचे पालन करत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या वेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय ढगे, सचिव मुकुंद वाखारे, खजिनदार महादेव बोत्रे, संचालिका चारुशिला जोशी, संचालक महाद्रंग वाधेरे, संजय कुटे, मनोज माछरे, आबा गोरे, राजाराम चिंचवडे, दिलीप गुंजाळ, नथा मातेरे, रमेश चोरघे, यशवंत देसाई, नंदकुमार घुले आदी उपस्थित होते.
सीमा सुकाळे यांनी वार्षिक सभेपुढील सर्व विषयांचे वाचन केले. या सर्व विषयांना उपस्थित सभासदांची बहुमताने मंजुरी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभासदांना भेटवस्तू देण्याचे निश्चित केले. तसेच सेवानिवृत्त व सलग २५ वर्षांपासून सभासद असलेल्यांना ५ हजार रुपये रक्कम बक्षीस म्हणून अदा करण्यात आले. त्याचबरोबर मनपाप्रमाणे संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सेवा उपदान लाभ लागू करण्यात आला. सचिव वाखारे यांनी सभासदांचे आभार मानले.


















