- आरोपींकडून वाहनांची तोडफोड; लोकांना मारून टाकण्याची धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे. २०२१) :- चिखलीतील घरकुलमध्ये शनिवारी रात्री आठच्या सुमारास आरोपींनी कोयत्याने व सिमेंटच्या गट्टूने दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली. त्यावेळी लोक तेथे आले असता आरोपींनी त्यांच्या दिशेने सिमेंटचे गट्टू फेकले.
तसेच त्यांनी लोकांना पाहून आरडाओरडा करून शिवीगाळही केली. जो आमच्या नादी लागेल त्याला मारून टाकू अशी धमकी देऊन काही कारण नसताना परिसरात दहशत माजवली.
आकाश उर्फ सिद्धार्थ बालाजी गायकवाड (वय २८, रा. घरकुल, चिखली) यांनी या प्रकरणी रविवारी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अतुल निसर्गंध तसेच चंद्या उर्फ महेश चंदनशिवे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह मन्या कोरी, निसर्गंध याचा लहान भाऊ तसेच त्यांच्यासोबत असलेले इतर दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













![[ब्रेकिंग न्यूज] लाचखोरीच्या आरोपानंतर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे निलंबित!...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/Screenshot_20261104_200149_Google-190x122.jpg)




