- किवळे परिसरात घेतलाय फ्लॅट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे. २०२१) :- महेंद्रसिंग धोनीने पिंपरी चिंचवडमध्ये घर घेतले असून तो आता पिंपरी-चिंचवडकर झाला आहे. धोनीने किवळे परिसरात नवे घर घेतल्याची माहिती समोर आली आहे. धोनी अनेकवेळा या घरी आल्याचे येथील नागरिक सांगतात.
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलचे सामने खेळण्याच्या निमित्ताने धोनी पुण्यात यायचा. याच काळात महेंद्रसिंह धोनीने गहूंजे क्रिकेट स्टेडियम जवळच असणाऱ्या किवळे परिसरात फ्लॅट घेतला.
तेव्हा पासून धोनी तीन ते चार वेळेस या फ्लॅटवर राहण्यास आला असल्याचे येथील नागरिक सांगतात. किवळे येथील ‘एस्टाडो प्रेसिडेंशियल’ या सोसायटीत धोनीने आपलं नवं घर घेतलं आहे.