- वेश्या व्यवसायप्रकरणी आरोपींना ऐवजासह अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे. २०२१) :- भोसरीतील वनराज हॉटेल, रेस्टॉरंट व लॉजमध्ये ४१ वर्षीय महिलेला पैश्याचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले. पोलिसांनी छापा टाकून आरोपींना ताब्यात घेत सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
धावडे वस्तीतील साईराज लॉजवर २६ वर्षीय महिलेला पैश्याचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले. पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून आरोपींना ताब्यात घेत ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सद्दाम मकबुलमिया अन्सारी (वय ३०, रा. धावडे वस्ती भोसरी, मुळगाव – मधुपूर, झारखंड) याला ताब्यात घेतले आहे. तर, प्रकाश आनंद शेट्टी (रा. वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.