न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज रविवारी (दि. ३०) रोजी ४१९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ५४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २५०१५३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २४०९०२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४०४६ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या २० एवढी आहे.


















