- खरेदीसाठी पालिकेने मागवल्या दोन स्वतंत्र निविदा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. मे. २०२१) :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थेरगाव, आकुर्डी आणि जिजामाता रुग्णालयामध्ये आयसीयू युनिट सुरू करण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मात्र, या एकाच प्रकारच्या खरेदीसाठी दोन स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविली. त्यामध्ये तीन ठेकेदारांकडून दहा प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण ९ लाख ८६ हजार रूपये खर्च होणार आहे.
थेरगाव, आकुर्डी आणि जिजामाता रुग्णालयामध्ये आयसीयू युनिट सुरु करण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या साहित्याच्या एकूण ३५ बाबी मिळण्यासाठी भांडार विभागास कळविले. त्यानुसार पाच आणि १० उपकरणे खरेदी आणि साहित्य तातडीने खरेदीसाठी ठेकेदारांकडून अल्प मुदतीच्या दोन वेगवेगळ्या निविदा मागविल्या.
पहिल्या निविदेत महेश सर्जिकल अॅन्ड फॉर्मासिटिक्स यांचा एका साहित्यासाठी सर्व करांसह एकूण १ लाख ७० हजार रुपये इतका दर प्राप्त झाला. दर हा अंदाजपत्रकीय २ लाख ८७ हजारांपेक्षा ४०.६४ टक्क्यांने कमी आहे. आर्थोरोंन टेक्नोलॉजी अॅन्ड एंटरप्रायजेस यांचे तीन बाबींसाठी सर्व करांसह २ लाख ५९ हजार लघुत्तम दर प्राप्त झाले. हे दर अंदाजपत्रकीय ४ लाख २४ हजार रुपयांपेक्षा ३८.९१ टक्क्यांनी कमी आहे.
दुसऱ्या निविदा प्रक्रीयेत आोरॉन टेक्नोलोजी अॅन्ड एंटरप्रायजेस यांचे चार बाबींसाठी सर्व करांसह एकूण ३ लाख ६१ हजार लघुत्तम दर दिले. दर हे अंदाजनकीय ५ लाख ६७ हजार रुपयांपेक्षा ६ टक्क्यांनी कमी आहे. महेश सजिकल अॅन्ड फार्मासिटिक्स यांचा एका साहित्यासाठी सर्व करासह एकूण ७० हजार लघुत्तम दर प्राप्त झाला पी. शेषादी कंपनीचा एका साहित्यासाठी सर्व करासह एकूण १ लाख २४ हजार रुपये इतका लघुत्तम दर प्राप्त झाला. एकूण साहित्य खरेदीसाठी एकूण लाख ५६ हजार रुपये इतका खर्च होणार आहे.


















