- पहिल्या टप्प्यातील घरांचे आरसीसी बांधकाम पूर्ण..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. मे. २०२१) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून पेठ क्रमांक १२ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत नागरिकांसाठी ४ हजार ८८३ घरे बाधून तयार झाली आहेत. या घरांचे आरसीसी बांधकाम पूर्ण झाले आहे. सध्या येथील नागरी सुविधा आणि सदनिकांमधील अंतर्गत कामे सुरू आहेत.
प्राधिकरणाकडून पेठ क्रमांक १२ मध्ये पहिल्या टप्प्यात ४ हजार ८८३ घरे उभारण्याचे नियोजन असून त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ३ हजार ३१७ तर, अल्प उत्पन्न गटासाठी १ हजार ५६६ सदनिका उभारल्या आहेत. प्राधिकरणाकडून या सदनिकांची सोडत नुकतीच ऑनलाइन सोडत काढण्यात आली आहे. गृहप्रकल्पातील विद्युतीकरण, रंगरंगोटी, फरशा बसवणे, दरवाजे व खिडक्यांची कामे, पाणीपुरवठा आदी कामे सध्या सुरू आहेत.
त्याशिवाय, प्रकल्पाजवळ उभारण्यात येणाऱ्या विविध नागरी सुविधांची कामे देखील सध्या सुरू आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने १२ व १५ मीटर अंतर्गत डांबरी रस्ते, मलनि: स्सारण वाहिन्या, जलनि:सारण वाहिन्या, मैलाशुद्धीकरण केंद्र, विद्युतीकरण, संरक्षक भिंत आदी प्रमुख कामांचा समावेश आहे.
प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १२ मधील गृहप्रकल्पात पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या घरांचे आरसीसी बांधकाम पूर्ण झाले आहे. गृहप्रकल्पातील अंतर्गत कामे तसेच नागरी सुविधांची कामे सध्या सुरू आहेत.
– बन्सी गवळी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण.


















