- कोरोना काळातही चोरट्यांकडून दुचाक्या व रिक्षांची चोरी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यात काही अज्ञात व ज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी व दोन रिक्षा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रविवारी (दि. ३०) निगडी व हिंजवडी पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एकाची दुचाकी दुर्गानगर झोपडपट्टी येथे शनिवारी लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. विक्रम शेषेराव वनवे (वय ४५, रा. दुर्गानगर झोपडपट्टी, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुसऱ्याची रिक्षा घराजवळील रस्त्यावर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती रिक्षा चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार २२ मे रोजी रात्री ११ ते २३ मे रोजी सकाळी सातच्या दरम्यान घडला. साकिर अजिज शेख (वय ३३, रा. राहुल नगर, ओटास्किम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तर तिसऱ्याची दुचाकी गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घरासमोर लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. भानुदास रामचंद्र कलाटे (वय ५१, रा. कस्तुरी चौक, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौथ्याची तीस हजार रुपये किंमतीची आटो रिक्षा घराच्या समोर लॉक करून पार्क केली होती. चोरट्यांनी ती रिक्षा चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीड ते सायंकाळी सहाच्या दरम्यान घडला. इमानदार रामा लोमटे (वय ३६, रा. वाकड) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुणाल सुरेश जगताप (रा. पिंपळे निलख), प्रदीप कांबळे (रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















