- पैसे मागितले असता कंपनी बंद करून आरोपींची धूम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे. २०२१) :- दोघांनी थायलंडच्या बँकॉकमधील थाई ॲक्वा कंपनीमध्ये भागीदारी देण्याचे व मोठ्या नफ्याचे फिर्यादीला आमिष दाखवले. कंपनीत २२ लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. कंपनीच्या नफ्या-तोट्याचा हिशेबही दिला नाही.
कंपनीमध्ये गुंतवलेल्या रकमेची मागणी केली असता आरोपींनी ती रक्कम परत न देता कंपनी परस्पर बंद केली. तसेच कंपनीतील मशिनरी सुरत येथे नेऊन दुसरी कंपनी स्थापन करून फिर्यादीची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी येथे ऑगस्ट २०१८ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत ही घटना घडली.
चंद्रकांत प्रभुदास ठक्कर (वय ५४, रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. ३०) फिर्याद दिली आहे. हेमिन जसुभाई खोखर, दिव्यांग कानुभाई डोबारीया (दोघेही रा. सुरत, गुजरात), अशी आरोपींची नावे आहेत.













![[ब्रेकिंग न्यूज] लाचखोरीच्या आरोपानंतर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे निलंबित!...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/Screenshot_20261104_200149_Google-190x122.jpg)




