न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. २९ डिसें.) :- पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरात योग विद्या धाम ऋग्वेद योग केंद्राच्या वतीने मंगळवार (दि. २५) रोजी महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
योग शिक्षक वर्गाच्या संचालिका योग पंडित शीला कुंभार यांनी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. योग विद्या धामचे योगाचार्य प्रमोद निफाडकर, चेतना सुभाष कुटे व योगा वर्गातील सुमारे पन्नास महिला या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या.
ऋग्वेद योगा केंद्रातर्फे महिलांसाठी योग प्रसार-प्रचार, महिलांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी योग शिक्षक वर्गातील साधक महिलांचे विशेष सहकार्य लाभले.










