न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. २९ डिसें.) :- रहाटणी प्रभाग क्रमांक २७ मध्ये विविध विकासकामांचा धडाका चालू आहे. या विकासकामांतर्गत गोडांबे कॉर्नर ते नढेनगर चौक या १२ मीटर रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते शुक्रवार (दि. २८) रोजी शुभारंभ करण्यात आला आहे.
यावेळी नगरसेविका सुनीता तापकीर, सविता खुळे, नगरसेवक चंद्रकांत नखाते, बाबा त्रिभुवन, राज तापकीर, शुभम नखाते, अमोल थोरात, विनोद तापकीर, गणपत नखाते, बाळासाहेब नखाते, जयवंत नढे, अनिल नखाते, गणेश नखाते, दीपक जाधव, भरत ठाकूर, माधव मनोरे, रवींद्र धुमाळ, संदीप नखाते, कैलास गोडांबे, रोहन तांबे यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
गोडांबे कॉर्नर ते नढेनगर चौक या रस्त्याच्या कामास चार कोटी एक लाख रुपयांचा खर्च केला जाणार असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन मीटर फूटपाथ असणार आहे. तसेच या रस्त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे.










