न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे. २०२१) :- प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, दानशुर राज्यकर्त्या आणि महान योध्दया असणा-या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समानतेच्या दृष्टिकोनातुन केलेल्या लोकोपयोगी कार्याचा दिपस्तंभ सतत प्रेरक आणि मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी नागरीकांना शुभेच्छा देताना महापौर माई ढोरे बोलत होत्या.
प्रारंभी मोरवाडी चौक, पिंपरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयास महापौर माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या कार्यालयास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, भाजपा राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी अमोल थोरात, माजी नगरसदस्य राजु दुर्गे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण रुपनर, नागेश पितर, महावीर काळे, मुकुंदराव कुचेकर, संजय कवितके, संजय नायकवाडे, बंडु शेठ लोखंडे, रोहिदास पोटे, गणेश एकल, सोनाताई गडदे, आशा काळे आदि उपस्थित होते.
त्यानंतर महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसेवक केशव घोळवे, नगरसदस्यया अनुराधा गोरखे, उप आयुक्त सुभाष इंगळे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
सांगवी येथील महानगरपालिका शाळेजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयास महापौर माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, ह प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे, नगरसदस्य संतोष कांबळे, नगरसदस्या शारदा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अजय दुधभाते, सुर्यकांत गोफणे, काका वाघमोडे, पराग मामुंणकर उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जनहितार्थ अनेक काम देशभरात केली. शेतक-यांना आर्थिक मदत करुन त्यांचे जनजीवन उंचावण्यासाठी त्यांनी विशेष योजना राबविल्या, पाणी पुरवठयाकरीता विहीरी, घाट बांधले, पानवठे बांधले, धर्मशाळा बांधल्या,महिलांच्या उत्थानासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी काम केले, अंधश्रध्देच्या पलीकडे जाऊन सर्वधर्मसमभाव विचार त्यांनी अंगिकारला अशा सुधारणावादी, आदर्श राज्यकर्त्या असणा-या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा राज्यकर्त्यासह सर्वांनी जोपासावा असेही महापौर महापौर माई ढोरे म्हणाल्या.


















