न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर उद्या मंगळवारी (दि. १ जून) रोजी ‘कोव्हॅक्सिन’व ‘कोविशिल्ड’ लस नागरिकांना देण्यात येणार आहे. ‘कोव्हॅक्सिन’ चा दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोव्हॅक्सिन’ चा दुसरा डोस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, चिंचवड (तालेरा रुग्णालय), सावित्रीबाई फुले शाळा, जुने भोसरी रुग्णालया जवळ, नवीन जिजामाता रुग्णालय, या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल. प्रत्येकी १०० डोस केंद्रावर उपलब्ध असणार आहेत.
ज्या लाभार्थ्यांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) अशांना देण्यात येणार आहे. या अनुषंगाने फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’ पहिला व दुसरा डोस ३३ लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.


















