- बुलढाणा जिल्ह्यात आयसोलेशन सेंटरची उभारणी; नागरिकांना दिलासा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२१) :- सध्या कोरोनाची गंभीर परिस्थती लक्षात घेऊन मोशीतील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजाला दिलासा मिळवून देणारे विविध विधायक उपक्रम कर्तव्यम सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून राबवून वाढदिवस साजरा केला. त्याबद्दल भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी कर्तव्यम फाउंडेशन आणि संतोष बारणे यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.
कर्तव्यम् सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून संतोष बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कोविड तपासणी शिबिर, म्युकरमायकोसिसबद्दल मार्गदर्शन, सोसायट्यांमध्ये वृक्षांचे वाटप, मास्क वाटप, गरजूंना अन्नधान्याचे किट वाटप, धूरफवारणी, अनाथआश्रमात अन्नदान तसेच पांजरपोळ ट्रस्ट पुणे येथील गोशाळेत जनावरांसाठी चारा वाटप असे विविध सामजिक उपक्रम राबविण्यात आले.
महाराष्ट्रभर कौतुकास्पद काम करणाऱ्या दिव्या फाउंडेशन च्या वतीने बुलढाणा येथे संतोष बारणे कोविड आयसोलेशन सेंटर ची उभारणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली आहे. सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज आयसोलेशन सेंटर रुग्णसेवेत रुजू होणार आहे. दिव्या फाउंडेशनने या ठिकाणी ५० बेड सह ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका, कोविड १९ तपासणी, रुग्णांसाठी सकस आहाराची सोय, व मेडिकल अशा सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
रविवार ( दि .३० ) रोजी मोशीतील भारत पेट्रोल पंप येथे सकाळी ९ ते दुपारी १ दरम्यान मोफत करोना तपासणी शिबिर कोरोनातून बरे झाल्यानंतरची काळजी तसेच म्युकरमायकोसिस आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर मोशी परिसरातील सोसायट्यांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करून, वृक्ष वाटप करण्यात आले. गोरगरीब गरजूंना अन्नधान्य वाटप, पांजरपोळ ट्रस्ट येथील जनावरांसाठी चारा वाटप व ११ हजार रुपयांची मदत, पिंपरी ठाकर येथील अनाथ आश्रमामध्ये अन्नधान्य वाटप तसेच ११ हजार रुपयांची मदत, सफाई कर्मचाऱ्यांना ११ हजार रुपयांची मदत, सोसायट्यांमध्ये किटकनाशक धूरफवारणी व डॉक्टर्स आरोग्यसेवकांचा सन्मान, परिसरात सुमारे २५०० मास्कचे वाटप तसेच वृक्षारोपण करण्यात आले.
‘ज्या समाजात आपण प्रगती करतो त्या समाजासाठी आपण काही देणं लागतो, समाजासाठी काही भरीव करण्याची इच्छा आणि जिद्द मोजक्या लोकांकडे असते. त्यातलेच एक सामाजिक कार्यकर्ते म्हणजे संतोष बारणे. त्यांचे, कर्तव्यम फाउंडेशन चे तसेच दिव्या फाउंडेशन चे सामाजिक काम समाजाला प्रेरणा देणारे असून त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे’. असे मत आमदार महेश लांडगे यांनी यावेळी व्यक्त केले.
याबाबत अधिक माहिती देताना संतोष बारणे म्हणाले की सध्या वाढदिवस साजरा करण्यासारखी परिस्थिती नसुन संकटात फरफट होणाऱ्या नागरिकांना आधार देणे आवश्यक आहे. निसर्गचक्राचा विचार करून आपण पर्यावरण संवर्धन आणि समतोल साधण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन आवश्यक आहे. वाढदिवसानिमित्त याचेच महत्त्व पटवून देण्यासाठी वृक्ष वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बुलढाणा येथील दिव्या फाउंडेशन च्या वतीने गरजू रुग्णांना रुग्णसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे, त्याशिवाय अन्नदान व चारा वाटप असे उपक्रम राबविल्याने अनेकांना या माध्यमातून मदत मिळेल.
यावेळी उद्योजक गणेश जाधव, अमोल मारणे, शिवाजी बारणे, सचिन बारणे, मोशी हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, इरसेड संस्था व्यवस्थापक नागेंद्र उंबरे, मोशी पोलीस मित्र संस्थेचे अध्यक्ष शाम मारके, सागर बोऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते विकास साने, गणेश कुटे, संदीप पाटील, राकेश गायकवाड, विशाल जाधव, अजय अग्रवाल, डॉ. शिल्पा जैन, डॉ. अंकिता जैन, शामल गोसावी, ज्योत्स्ना बधे आदी मान्यवर उपस्थित होते. दिव्या फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अशोक काकडे, मुख्य अधिकारी आशिष खडसे यांनी संतोष बारणे यांचे आभार व्यक्त केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.


















