- रिक्षावरून भांडण, कोयता उगारून लाथाबुक्क्यांनी मारहाण..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२१) :- दापोडीतील जयभीम नगरमध्ये एकाने रिक्षा न विचारता नेली होती. त्याचा फिर्यादीने आरोपींना जाब विचारला. त्यावरून आरोपींनी फिर्यादीशी भांडण करून शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने कोयता घेऊन इतर आरोपींना सोबत आणून फिर्यादीच्या लहान दिराच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ केली. त्यांच्या घराच्या दरवाजावर कोयत्याने मारले. काचेच्या दोन खिडक्या फोडल्या. पार्किंगमधील सायकलचे नुकसान केले. बाहेरील मेनगेट फोडले. फिर्यादीच्या जाऊला धक्काबुक्की करून तिच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याचे कपडे फाडले. मारण्याची धमकी दिली.
तसेच फिर्यादी तक्रार देण्यासाठी भोसरी पोलीस ठाण्यात आल्या त्यावेळी आराेपी रिव्हॉल्वर घेऊन फिर्यादीच्या दिराच्या घरी आला. फिर्यादीच्या दिराला रिव्हॉल्वरने मारून टाकण्याची धमकी दिली, असे फिर्यादीच्या दिराने त्यांना फोन करून सांगितले. आरोपींनी परिसरामध्ये दहशत माजवली व लोकांनी भीतीने तेथून पळून जात घरात जाऊन घरे बंद करून घेतली. सोमवारी (दि. ३१) रोजी ही घटना घडली.
फरिदा अख्तर शेख (वय ४०, रा. जयभीम नगर, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साहील वाल्मीकी, नरेश वाल्मीकी, बॉबी पिल्ले, जंगल्या उर्फ अक्षय भालेराव, कानसो (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), अशी आरोपींची नावे आहेत.