- पतीसह सासू सासऱ्यावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२१) :- विवाहितेला पाच लाख रुपये हुंड्यासाठी घालून पाडून बोलून हाताने मारहाण केली. तसेच उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला. तिला वैवाहिक जीवन चांगल्या प्रकारे जगू दिले नाही.
ही घटना हिमाचल प्रदेश, विशाखापट्टणम व पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे ८ मार्च २०१८ ते २५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत घडली. विवाहितेने या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार तिचा पती अनिष होसियारसिंग चौहाण (वय ३१), सासरे होसियारसिंग चौहाण (वय ६०), सासु बसलानदेवी होसियारसिंग चौहाण (वय ५५, रा. विशाखापट्टणम) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.