- आरोपी अटकेत; बघ्यांची जमली होती गर्दी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२१) :- आईवरून शिवीगाळ केल्याने एका दारुड्याला प्रचंड राग अनावर झाला व त्याने संतपाच्या भरात रस्त्यावर पडलेला दगड दुसऱ्या दारुड्याच्या डोक्यात घालत, त्याचा दगडाने ठेचून खून केला.
दोघेही दारू पिऊन रस्त्याने जात असताना त्यांच्यात वाद झाला. आज मंगळवारी (दि. १) रोजी दुपारी चार वाजता ही घटना घडली. घटनास्थळी केवळ बघ्यांची गर्दी जमली होती.
अनिल शिंदे (वय- ५०) असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून यश गोपी असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला घटनास्थळावरून पोलिसांनी अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.