न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसें.) :- नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दारू विक्रीच्या दुकानांना पहाटे दीडपर्यंत; तर परमीट रूम, बिअर बार आणि हॉटेलकरिता पहाटे पाचपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
आयुक्त पद्मनाभन म्हणाले, ‘‘सरकारने काढलेला अध्यादेश आमच्यापर्यंत अद्याप आलेला नाही. तरीही अशा प्रकारचा अध्यादेश असल्यास तो मिळवून त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.’’ यामुळे आता नववर्षाचा जल्लोष पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले. या दिवशी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी यापूर्वीच दिले आहेत. पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गस्तही वाढविण्यात येणार आहे.










