न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसें.) :- रावेत बीआरटीएस या मार्गावारील जगताप डेअरी साई चौक येथील श्री. छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलाचा काळेवाडीकडुन औंधच्या दिशेने जाणाऱ्या पुलाचा एकेरी मार्ग सोमवारी (दि. ३१) डिसेंबरला सकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार, असल्याची माहिती नगरसेवक नाना काटे यांनी दिली.
नाना काटे यांनी प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्याशी चर्चा करून, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा एकेरी मार्ग सुरू करण्याची मागणी केली. हा मार्ग सोमवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन खाडे यांनी दिले असल्याचे नाना काटे आणि नगरसेविका शीतल काटे यांनी सांगितले.










