- रहाटणीतील घटना; सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२१) :- आईचा वाढदिवस साजरा करून सर्वजण त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या घरासमोरील ओट्यावर आरोपीने मोठमोठ्याने शिवीगाळ केली. याचा फिर्यादी यांनी आरोपीला जाब विचारला. त्यावेळी सर्व आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या दोन्ही भावांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांचा मोठ्या भावाच्या डाव्या हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. १) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास शिवाजी चौकाजवळ रहाटणी येथे घडली. सम्राट गोरखा असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह आकाश गोरखा, विक्रम नरबहादुर गोरखा (वय २९, रा. पवनानगर, रहाटणी गाव) या दोघांनाही मारहाण झाली आहे.
याबाबत विक्रम यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल लोंढे (वय २२), खंडू लोंढे (वय २४), चेंड्या (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही), संदेश (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.