- वाकड पोलीस ठाण्यात महिलेकडून विनयभंगाची तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. जून. २०२१) :- मजुरांनी चार्जिगसाठी ठेवलेल्या मोबाइलमधील सिमकार्ड स्वत:च्या मोबाइलमध्ये टाकून त्या क्रमांकावर व्हॉट्सअॅप डाऊनलोड करून त्याद्वारे इतर महिलांना अश्लील मेसेज, तसेच व्हिडिओ कॉल केले. याप्रकरणी एका विकृत व्यक्तीस अटक केली आहे. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली.
संपत राम सन ऑफ शंकरराम (रा. जोधपूर, राजस्थान, सध्या रा. बाणेर, पुणे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात विनयभंगप्रकरणी फिर्याद दिली.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला दोन वेगवेगळ्या क्रमांकांवरून अश्लील मेसेजेस व अश्लील व्हिडिओ कॉल आले. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि सुनील टोणपे यांनी तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीची माहिती काढून त्यास अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मजुराच्या व्हॉट्स अॅप मोबाइल क्रमांकावरून फर्निचरच्या दुकानातील ग्राहकांच्या मोबाइलवर तो अश्लील फोन करीत असे. अनेक महिलांना फोन केला असल्याची शक्यता आहे.
सिमकार्डचा गैरवापर
आरोपी संपत याचे चहाचे दुकान होते. कामावर जाणारे गरीब मजूर त्याच्याकडे मोबाइल चाजिंगसाठी देत. जे मोबाइल साधे व ज्यामध्ये व्हॉट्स अॅप नाही. अशा मोबाइलचे सिमकार्ड तो त्याच्या स्वतःच्या मोबाइलमध्ये टाकत असे. आरोपी संपत हा पूर्वी एका फर्निचरच्या दुकानात कामाला होता. त्यावेळी आलेल्या ग्राहकांचे नंबर तो आपल्याकडे ठेवत असे. त्यावरून तो फोन करत होता.