- माजी महापौर राहुल जाधव यांची राज्य सरकारकडे मागणी..
- श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२१) :- दत्तदिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या मंगलताई राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिम्मित माजी महापौर राहुलदादा जाधव यांच्यावतीने सोमवारी (दि. ३१) रोजी श्री क्षेत्र भीमाशंकर येथील ग्रामस्थांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे राज्यातील तीर्थस्थळे भाविकांसाठी बंद आहेत. त्यामुळे छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत. भीमशंकर परिसरातील ग्रामस्थांची गुजराणही त्यावरच चालते. समजाप्रती सामाजिक दृष्टीकोन बाळगून श्री क्षेत्र भीमाशंकर येथील ३०० कुटुंबाना प्रत्येकी २ किलो गहु, १ किलो तांदूळ, १ किलो साखर, अर्धा किलो डाळ, १ किलो तेल, चहा पावडर आदी संसारपोयोगी साहित्याचे भाजपचे शहराध्यक्ष तथा आ. महेशदादा लांडगे याच्या हस्ते वाटप वाटण्यात आले.
राहुल जाधव म्हणाले, भीमाशंकर परिसरातील ग्रामस्थांसाठी एक छोटासा मदतीचा हात पुढे केला आहे. ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. मात्र, राज्य शासनाने राज्यातील सर्वच तीर्थक्षेत्रातील ग्रामस्थ व छोट्या व्यापाऱ्यांना कोरोना काळात भरीव मदत करावी. त्यासाठी आम्ही नक्कीच पाठपुरावा करू.
आमदार महेशदादा लांडगे यांनी माजी नगरसेवक राहुल जाधव व सामाजिक कार्यकर्त्या मंगलताई जाधव यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. भीमाशंकर देवस्थानचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी मदतीसाठी आमदार महेशदादा, राहुल जाधव व मंगलताई जाधव यांचे आभार मानले.

















