न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. जून. २०२१) :- राज्य शासनाच्या ‘सुंदर माझे कार्यालय’ या अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी आकुर्डी येथील अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाला भेट देत पाहणी केली.
बारवकर यांनी तहसील कार्यालयाची पाहणी केली. यामध्ये कार्यालयातील अभिलेख कक्ष, कार्यालयातील स्वच्छता व नीटनेटकेपणा याचे निरीक्षण केले. तसेच पुढील कामकाजाच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. करोनाच्या काळामध्येही जनतेला अविरत सेवा देतानाही तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी ‘सुंदर माझे कार्यालय’, कसे असावे याचा नवा आदर्श घालून दिला आहे, असे गौरवोद्गार बारवकर यांनी काढले.
कार्यालयातील महसूल सहाय्यक उन्मेष मुळे यांच्या संकलनाचे सहा गट्ठा पद्धतीतील दप्तर तपासणी केली. या वेळी तहसीलदार गीता गायकवाड, नायब तहसीलदार प्रविण ढमाले, अव्वल कारकून अंकुश आटोळे, गणेश सोमवंशी, महसूल सहाय्यक उन्मेष मुळे, भिमाशंकर बनसोडे, महेश गायकवाड, प्रकाश राठोड, भावना पवार व शोभा गि-हे आदी उपस्थित होते.

















