- ४५ लाख रुपयांच्या फसवणुकीचा प्रयत्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. जून. २०२१) :- सहा जणांनी स्थापन केलेल्या कंपनीतील एका भागिदाराने त्रयस्थ व्यक्तीसोबत दुसरी कंपनी स्थापन केली. त्या कंपनीत ४५ लाख रुपयांचा चेक भरून फसवणुकीचा प्रयत्न केला. आकुर्डी येथे ९ डिसेंबर २०२० ते ३ जून २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
महादेव काशिनाथ लोखंडे (वय ४७, रा. शिरगाव, पुणे) यांनी या प्रकरणी गुरुवारी (दि.३) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. किशोर बंडु खूपसे, रियाज इमाम शेख (रा. कसबा पेठ, पुणे), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर याने फिर्यादी तसेच इतर सहा जणांसोबत मिळून डी. एस. के. एल. डेव्हलपर्स बिल्डर प्रा. लि. ही कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या खात्यात ४५ लाख रुपयांचा चेक भरतो, असे किशोरने सांगितले. मात्र कंपनीच्या खात्यात चेक न भरता आरोपी रियाज याच्यासोबत मिळून दुसरीच डी. एस. के. एल. डेव्हलपर्स नावाची कंपनी स्थापन केली.
या कंपनीच्या नावाने आकुर्डी येथे एका बँकेच्या शाखेत खाते उघडून त्यात ४५ लाखांचा चेक भरला. हा प्रकार फिर्यादी यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी बँकेकडे संपर्क करून सदरची रक्कम अदा करण्याबाबत कळवले.

















