- पुराची समस्या मिटेल; पालिकेकडून काम सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. जून. २०२१) :- पावसाळ्यात बंधारा भरल्याने चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर, केजुबाई बंधारा, झोपडपट्टी पाण्याखाली जाते. त्यामुळे रावेत बंधाऱ्याच्या उंचीमध्ये वाढ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
सीमाभिंत २ फुटांनी वाढविण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, बंधाऱ्यांची उंची वाढविल्यानंतर ७५ कोटी लिटर पाण्याचा साठा होणार आहे. सध्या रावेत येथील बंधाऱ्यात ५० कोटी लिटर पाण्याचा साठा होतो. तो वाढविण्याच्या उद्देशाने बंधाऱ्याच्या उंचीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला.
हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक आठवड्याचा कालावधी लागणार आहे. या कामासाठी अंदाजे साडेआठ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे पुराची समस्या मिटेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण लडकत यांनी दिली.

















