न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. जून. २०२१) :- पेट्रोल डिझेल दरामध्ये होत असलेल्या दैनंदिन व सातत्याच्या दरवाढी विरोधात आज पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने पिंपरी चौकातील एच.पी.पेट्रोल पंपाजवळ केंद्रातील भाजपा सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनाद्वारे हातात निषेध फलक, युवक काँग्रेसचे झेंडे व घोषणा देत मोदी सरकार चा खोटी आश्वासने देऊन देशाची फसवणूक केल्या बाबत जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अक्षय जैन, कौस्तुभ नवले, पिंपरी चिचंवड काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विरेंद्र गायकवाड,महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यू.आय.चे उपाध्यक्ष उमेश खंदारे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस शंकर ढोरे, अलोक लाड, विशाल सरवदे, मिलिंद बनसोडे, योगेश नायडू, संतोष देवकर,अनिल सोनकांबळे, अर्णव कामठे, भूषण भंडारी, प्रविण जाधव, पांडूरंग वीर, बाबू खान आदी उपस्थित होते.
बीत गये अब कितने दिन कब आयेंगे अच्छे दिन ! मोदी सरकार मुर्दाबाद ! भाजपा सरकार मुर्दाबाद !पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घ्या ! अशा घोषणा देण्यात आल्या.

















