न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. जून. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी वय १८ ते ४४ वर्षे वयोगटातील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांनी आवश्यक वैध पुराव्यानिशी ‘ मी जबाबदार’ नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिम दि.०५ जून २०२१ रोजी नवीन जिजामाता रुग्णालयात राबविण्यात आले.
या मोहिमेमध्ये मी जबाबदार ऍप वर नोंदणी केलेल्या २१६ लाभार्थ्यांपैकी प्रत्यक्ष लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर १०१ लाभार्थी उपस्थित होते. यामधील ०४ लाभार्थीअपात्र होते व पात्र ९७ लाभार्थ्यांना आज लसीकरण करण्यात आलेले आहे.
तसेच उद्या रविवार दि.०६ जून २०२१ रोजी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहतील.
















