- आरोपी अटकेत; सरकारी कामात अडथळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०२१) :- पिंपरी चिंचवड पोलिसांनी एका आरोपीला पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच कोणतीही परवानगी न घेता तो शहरात आला.
त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेले. त्याला ताब्यात घेत असताना त्याने पोलिसांना धक्काबुक्की करून हाताने ढकलून खाली जमिनीवर पाडले. ही घटना रविवारी (दि. ६) दुपारी वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड येथे घडली.
वीरेन्द्र उर्फ बेंद्या भोलेनाथ सोनी (वय २२, रा. चिंचवडे कॉलनी, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई स्वप्नील शेलार यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी वीरेंद्र याला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.