- निगडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०२१) :- सिमेंटच्या थैलीचा फुफाटा उडाल्याने दोन गटात मारहाण झाली. ओटा स्कीम निगडी शनिवारी (दि. ७) दुपारी एकच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय मसू कांबळे (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुधाकर कदम, शीतल कदम, सूर्यकांत कदम, राधिका कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कांबळे यांच्या घरासमोरून शेजाऱ्यांचे घाण पाणी वाहत असल्याने फिर्यादी हे सिमेंटचा बंधारा बांधत होते. त्यावेळी सिमेंट उभरताना फुफाटा उडाला. या कारणावरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांच्याशी वाद घातला. तसेच त्यांना दगडाने मारहाण करून जखमी केले.
राधिका अशोक कदम (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय कांबळे, विजय कांबळे यांचा भाचा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी, त्यांचे दीर, जाऊ, सासरे यांना शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली. फिर्यादी आणि त्यांचे सासरे यामध्ये जखमी झाले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
















