- अनोळखी चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जून २०२१) :- नवी सांगवीतील फेमस चौकातील वंदना स्विटच्या रस्त्याने फिर्यादी पायी चालत होत्या. त्यावेळी एका लाल रंगाच्या दुचाकीवरून दोन चोरटे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या हातातील ८० हजार रुपये किमतीचा अॅप्पल कंपनीचा मोबाइल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला.
ही घटना रविवारी (दि. ६) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. शलाका संजय बनकर (वय २२, रा. आदर्शनगर, नवी सांगवी) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका लाल रंगाच्या दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.