- तरुणाची गळफास घेत आत्महत्या; भोसरीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जून २०२१) :- भोसरी परिसरातील एम्फेनाॅल कंपनीत फिर्यादीचा मुलगा काम करत होता. कंपनीत काम करत असताना आरोपीने एका महिलेला शिवीगाळ केली. या कारणावरून आरोपीने फिर्यादीच्या मुलाचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत असे खोटे आरोप केले.
तसेच त्याला दोन मोबाइल क्रमांकावरून फोन करून कंपनीच्या बाहेर आल्यावर हात पाय तोडतो अशी धमकी दिली. घाबरलेल्या तरुणाने (दि. ६) रात्री सात वाजताच्या सुमारास रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.
धनंजय गजानन भालेराव (वय २६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गजानन बबन भालेराव (वय ५७, रा. महाराष्ट्र चौक, भोसरी. मूळ रा. बुलढाणा) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बडेसाहब हुसेनसाब शेख (वय ५०, रा. खंडोबा माळ, भोसरी. मूळ रा. लातूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.