- तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२१) :- आकुर्डी रेल्वे स्टेशन रस्त्यावरील ऋतुजा ऑटो केटीएम नावाचे दुचाकीचे शोरूम अज्ञात चोरट्यांनी फोडले. सोमवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
चोरट्यांनी शोरूमचे शटर उचकटून आत प्रवेश केला. एक दुचाकी व स्पेअर पार्ट असा एकूण दोन लाख ७१ हजार २२५ रुपयांचा माल चोरी करून नेला. ऋतुजा शिवराज कोरटकर (वय २९, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.