- अज्ञाताकडून स्पेअर पार्टचे तीन बॉक्स गायब…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२१) :- कासारवाडीतील सँडविक एशिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कंपनीच्या स्टोअर रूममध्ये ठेवलेले ४ लाख २५ हजार ४४७ रुपये किमतीचे स्पेअर पार्टचे तीन बॉक्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना २१ मे ते २५ मे या कालावधीत घडली.
प्रतीक चंद्रकांत खेडेकर (वय २८, रा. उरुळी कांचन, पुणे) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात सात जून रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.