- ताम्हणे वस्तीतील घटना; तिघांच्या विरोधात गुन्हा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. जून. २०२१) :- किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमशक्तीनगर, ताम्हणे वस्ती, चिखली येथे रविवारी (दि.६) ही घटना घडली.
किरण बळीराम साळवे (वय २४, रा. भीमशक्तीनगर, ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रोहित पंडित, रोहन पंडित आणि अमर पोटभरे (सर्व रा. भीमशक्तीनगर, ताम्हाणे वस्ती, चिखली), अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे मित्र रंजीत बनसोडे गप्पा मारत बसले होते. त्यांच्या शेजारी त्याच्याच वस्तीतील ओळखीचे आरोपी देखील बसले होते. फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांमध्ये मस्करी सुरू असल्याने ते हसत होते. त्यावेळी अचानक आरोपी हे फिर्यादीकडे आले आमच्याकडे बघून मुद्दाम हसतो का आता तुला दाखवतो, असे म्हणून आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फरशीचा तुकडा, दगड व काचेची बाटली मारून फिर्यादीला मारहाण करून जखमी केले.