- खुनाचा प्रयत्न केल्याची तरुणाकडून फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. जून. २०२१) :- काही एक कारण नसताना तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली मारली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोदेवस्ती, भाजी मंडईजवळ, वाकड येथे सोमवारी (दि. ७) ही घटना घडली.
औदुंबर रवींद्र नाकते (रा. गोखलेनगर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. ऋषिकेश अनिल जाधव (वय २४, रा. वाकड), असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसोबत विनोदेवस्ती भाजीमंडई येथे दुचाकीवरून गेले होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. ‘ तुम्ही याला येथे कशाला आणले, तू येथे का आला तुला जिवंत ठेवत नाही ‘, असे म्हणून काही एक कारण नसताना फिर्यादीला ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपीने बिअरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले.