- अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. जून. २०२१) :- अनोळखी इसमाने मोबाइल क्रमांकावरून फिर्यादीला वारंवार फोन केला. पेट्रोल पंपाच्या लायसन्ससाठी, एनओसी करिता आणि सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून वेगवेगळ्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे भरण्यास सांगितले.
आरोपीने फिर्यादी यांच्याकडून सात लाख ८० हजार ६०० रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर फिर्यादी यांना लायसन्स न देता त्यांची फसवणूक केली. ही घटना डिसेंबर २०२० ते १७ एप्रिल २०१९ या कालावधीत ऑनलाइन घडली.
स्वामीनाथ राजवंशी सिंग (वय ४९, रा. मोशी प्राधिकरण) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात आठ जून रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.