- चिंचवडमधील घटना; गाडीचेही नुकसान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. जून. २०२१) :- टेम्पोचालक परभणीतून चिंचवडमधील रोहित कृषी इंडस्ट्रीज या कंपनीत माल घेऊन आले. विद्यानगर झोपडपट्टी येथे एका इसमाने फिर्यादी यांचा टेम्पो अडवला.
तू काय माझ्या अंगावर गाडी घालतो काय, असे म्हणून फिर्यादी यांच्या खिशातून पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. तसेच टेम्पोची समोरील काच दगड मारून फोडली.
ही घटना मंगळवारी (दि. ८) रात्री घडली. ज्ञानदेव रामचंद्र फडतरे (वय ४७, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.